मोहाली – आज IPL 2023 हंगामातील डबल हेडरचा पहिला सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना पंजाबच्या होम ग्राउंड मोहाली येथे खेळला जात आहे. दोन्ही संघांचे कर्णधार नवीन आहेत. पंजाबची कमान शिखर धवनकडे तर कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व नितीश राणा करत आहेत.
कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. पंजाबकडून भानुका राजपक्षेने सर्वाधिक 50 धावा केल्या. राजपक्षे याने अवघ्या 32 चेंडूत 50 धावा केल्या.
या खेळीदरम्यान त्याने दोन षटकार आणि 5 चौकार लगावले. याव्यतिरिक्त कर्णधार शिखर धवनने 40, सॅम करणने 26, प्रभसिमरन सिंगने 23 आणि जितेश शर्माने 21 धावांची खेळी केली.
Innings Break!@PunjabKingsIPL post a commanding total of 191/5 on the board 👌🏻👌🏻@KKRiders have a challenging task ahead of them. Can they do it 🤔
Scorecard ▶️ https://t.co/UeBnlhdZdr#TATAIPL | #PBKSvKKR pic.twitter.com/LiybpL5fEy
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023
कोलकाताकडून टीम साऊदीने 4 षटकात 54 धावा देत दोन बळी घेतले. उमेश यादव, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.