मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी (दि. 3) हल्ला करण्यात होता. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली होती. त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान, डिस्चार्ज दिल्यानंतर संदीप देशपांडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून आलं आहे. नुकतंच संदीप देशपांडे यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर ट्विट करत खोचक शब्दात टीका केल्याचं दिसून आलं. आपल्या ट्विट मध्ये देशपांडे म्हणतात, “एक दिवसाची नर्स होणं म्हणजे नौटंकी, मानेला पट्टा बांधून सहानभूती गोळा करण म्हणजे नौटंकी. कर्तृत्व शून्य माणसाला सहानुभूतीची गरज असते आम्हाला नाही. असो गरिबांचे SRA मधील सदनिका चोरण्यार्यांना ही अक्कल कशी येणार ????” या आशयाचे ट्विट त्यांनी केलं होत.
मात्र, आता देशपांडे यांच्या या ट्विटला किशोरी पेडणेकर यांनी दोन शब्दात उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. पेडणेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत संदीप देशपांडे यांची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं आहे. “बाळा इंजेक्शन हळूच लागणार…….’ असं म्हणत पेडणेकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बाळा इंजेक्शन हळूच लागणार……. pic.twitter.com/hdyPyfza0e
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) March 9, 2023
पुन्हा एकदा राज्यात करोना विषाणूने आपले डोकेवर काढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी नर्सिंगचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची अचानक भेट घेतली. यावेळी त्या नर्सच्या वेशात आल्या आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. आणि हाच धागा पकडून देशपांडे यांनी टीका केली होती.