मुंबई – विदेशी बाजारातील अमेरिकन चलनाची वाढलेली ताकद आणि देशांतर्गत शेअर्स मार्केटमधील नकारात्मक कल या पार्श्वभूमीवर बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 37 पैशांनी घसरून 82.29 वर आले.
सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत ग्रीनबॅकची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक बुधवारी 0.18 टक्क्यांनी वाढून 105.80 वर पोहोचला. यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदराच्याबाबत केलेल्या टिप्पणीने डॉलरला उच्चांकी भाव मिळाला आहे.
होळीनिमित्त मंगळवारी शेअर व चलन बाजार बंद होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत काहीशी वाढ होऊन हे भाव प्रति बॅरल 83.53 डॉलर्स इतके झाले.
#MahaBudget2023 : आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार
देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये, सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 348.62 अंकांनी घसरून 59,875.84 अंकांवर पोहोचला तर एनएसईचा निफ्टी 93.60 अंकांनी घसरून 17,617.85 अंकांवर पोहोचला.