पुणे – महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून वारजे जलशुध्दीकरण केंद्रातून चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या 1000 मिमी व्यासाच्या जलवाहीनीच्या गळतीची तातडीची येत्या सोमवारी ( दि. 20 ) रोजी दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम उपनगरांमधील वारजे, शिवणे, पाषाण, सुतारवाडी, बाणेर-बालेवाडी परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरा आणि कमी दबाने पाणी सोडण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य होण्याचे आवाहन केले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
बाणेर-पाषाण लिंक रोड, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सॅंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनीत चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इत्यादी.
वारजे जलशुध्दीकरण केंद्राचा परिसर
अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.