शिर्डी – पदवीधर निवडणुकीत कोणतीच भूमिका स्पष्ट न करणाऱ्या आ. थोरातांनी कॉंग्रेसला सोयीनूसार वापरण्यापेक्षा भूमिका स्पष्ट केली पाहीजे.महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून तुम्ही व्यथित आहात का असा सवाल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
कॉंग्रेस पक्षाची भूमिका मांडा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, असे थेट आव्हान देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, तुम्ही कॉंग्रेसला सोयीनुसार वापरू शकत नाही. नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत मुळातः आ. थोरात व्यथित झाले आहेत. त्यांच्या तालुक्यातील जनता त्यांना सोडून चालली आहे. त्यांच्या तालुक्यातील चार महत्वपूर्ण गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला यश मिळाले. त्यामुळेच आ. थोरात व्यथित झाले असल्याचा टोला विखेंनी लगावला.
तांबेंचा विषय संपला
सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणूकही संपली आहे. भाजपने दिलेल्या पाठींब्यामुळे निवडून आले.उद्याच्या काळात त्यांनी पक्षाच्या भूमिकेसोबत राहावे, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.