नवी दिल्ली – बाबा राम रहीम हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सध्या राम रहीम हे जेलमध्ये आहेत. परंतु ते आता जेलबाहेर येणार असल्याच्या चहरचा सध्या सुरु झाल्या आहेत. त्याला कारणही तसाच आहे. राम रहीमने जेल प्रशासनाकडे पॅरोलच अर्ज करून सत्संगासाठी जाण्याची परवानगी मागितली आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख असलेले राम रहीम हे यांचयवर हत्या आणि बलात्काराचे आरोप होते यामुळेच सध्या त्यांची जेलवारी सुरु आहे. अशात त्यांनी जेल प्रशासनाकडे सत्संगासाठी पॅरोल अर्ज केल्याचे समजते. हा सत्संग 25 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी राम रहिमने सिरसा येथे जाण्याची परवानगी जेल प्रशासनाकडे मागितली आहे. सच्चा सौदाचे दुसरे संत शाह सतनाम महाराज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 25 जानेवारी रोजी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
राम रहीम गेल्या वर्षी 15 ऑक्टोबर दरम्यान तब्बल चाळीस दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर आला होता. त्यावेळी तो त्याच्या कुटुंबियांसोबत डेरामधेच राहिला होता. यावेळी त्याने दिवाळी आणि इतर सत्संग देखील पार पाडलॆ होत. त्यामुळे राम रहिमला पुन्हा पॅरोल मंजूर होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राम रहिम हे जेलमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्या भक्तांची मोठी संख्या होती.मात्र तयांचयावर बलात्कार आणि खुनाचे आरोप झाल्यानंतर सर्व चित्र बदलला. असं असलं तरी राम रहिमच्या डेरामध्ये आजही सत्संग होत असतात, मात्र भक्तांची संख्या मात्र पहिल्याप्रमाणे नसते असे त्यांचे अनुयायी सांगतात.