कोरेगाव भीमा -अवघ्या सात दिवसांवर आलेल्या विजय रणस्तंभ अभिवादन सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने व सर्व सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहे. पेरणे फाटा येथील विजय रणस्तंभ परिसरासह वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा परिसराची पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पाहणी
यावेळी एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आढावा घेण्यात येत आह. याबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन मोठे कष्ट घेत आहेत. वाहन पार्किंग स्वच्छता, रंगरंगोटी, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बॅरीगेट, मंडप, आरोग्य कॅम्प, अग्नीशमन दल, राखीव पोलीस दल, पोलीस, जिल्हा प्रशासन, आरोग्य, बांधकाम विभाग, ग्रामपंचायतीच्या समन्वयाने मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत असून येणाऱ्या अनुयायांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे, उपविभागीय अधिकारी शिरूर यशवंत गवारी, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक महाडिक, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, माजी सरपंच अंकुश शिवले, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा आरगडे, माऊली भंडारे, माजी उपसरपंच लाला तांबे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे उपस्थित होते.