पुणे -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अधिकृत संकेतस्थळासारखेच बनावट संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे संदेश आणि संकेतस्थळाला कोणताही प्रतिसाद न देता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन “सीबीएसई’ने केले.
या बनावट संकेतस्थळाचा पत्ता हीींिी://ललीशर्सीीें.लो असा आहे. संबंधित बनावट संकेतस्थळाद्वारे दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी तयार करून डाऊनलोड करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना पैसे भरण्याबाबतचे संदेश पाठवण्यात येत आहेत. “सीबीएसई’ दहावी आणि बारावीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी थेट विद्यार्थी, पालकांकडून थेट पैसे घेत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी फसवणूक करणाऱ्या संदेशांबाबत सावधगिरी बाळगावी. विद्यार्थी, पालकांनी अधिकृत माहिती मिळवण्यासाठी ुुु.ललीश.र्सीें.ळप या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन बोर्डाने केले. “सीबीएसई’ने याबाबत परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
विशेष विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ
विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईने “परीक्षा संगम’ या स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांना या संकेतस्थळाद्वारे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, विशेष सुविधांची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना त्याबाबत नोंदणी करण्यासाठी 30 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.