मुंबई – फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने बलाढ्य फ्रान्सचा पराभव केला आणि लिओनेल मेस्सीच्या जगभरातील चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मेस्सीने आपल्या दमदार खेळाच्या बळावर अर्जेंटिनाला तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वविजेता बनवले. यासोबत त्याचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले. मेस्सीचा चाहता वर्ग हा अफाट असून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. मेस्सीच्या विजयाचा जल्लोष भारतातही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
“आईच्या आशीर्वादाशिवाय मी इथपर्यंत…”, सामन्यात जबरदस्त कामगिरी केल्यानंतर खेळाडूला आईची आठवण
दरम्यान, मेस्सीने फुटबॉल खेळात आपल्या कौशल्याच्या जोरावर मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. यावेळी तो अनेक विक्रमांसोबतच एका अनोख्या विक्रमाचाही मानकरी ठरला आहे. त्याने नावावर केलेल्या या विक्रमाबाबत ऐकून तुम्हालाही नवल वाटणार आहे. मेस्सीने सोशल मीडियावरील पोस्टला सर्वाधिक लाईक्स मिळवण्याच्या बाबतीत विक्रम रचला आहे. सोशल मीडियावर यापूर्वी एक अंडे असलेल्या पोस्टला सर्वाधिक लाईक्स मिळाल्या होत्या.
अर्जेंटिना विश्वविजेता झाल्यानंतर मेस्सीने आपले काही फोटो त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केले. त्यानंतर त्या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. मेस्सीने १९ डिसेंबर रोजी शेअर केलेल्या या पोस्टला आत्तापर्यंत ६ कोटी ९३ लाख ५३ हजार ९५५ लाईक्स मिळाल्या आहेत. त्यामुळे मेस्सीने सोशल मीडियावर सर्वाधिक लाईक्स मिळवण्याचा हा अनोखा विक्रम रचला आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे, ४ जानेवारी २०१९ रोजी वर्ल्ड ‘रेकॉर्ड एग’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात फक्त एका अंड्याचा फोटो शेअर केला होता. त्यावर आतापर्यंत ५ कोटी ७८ लाख ६१ हजार ८९२ लाईक्स मिळाल्या आहेत. त्याच्या या अनोख्या विक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram