“आईच्या आशीर्वादाशिवाय मी इथपर्यंत…”, सामन्यात जबरदस्त कामगिरी केल्यानंतर खेळाडूला आईची आठवण

मुंबई – पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्याच मायदेशात दारुण पराभव केला आहे. इंग्लंडने यजमान संघाला मालिकेत ३-० अशा फरकाने मात दिली. पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर एखाद्या मालिकेत क्लीन स्वीप करणारा इंग्लंड हा पहिला संघ आहे. या कसोटी मालिकेत पूर्णपणे दोन्ही देशांच्या फलंदाजांचा बोलबाला राहिला. दरम्यान, इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रेहान अहमदने ( Rehan Ahmed ) आपल्या गोलंदाजीने मोठी प्रसिद्धी मिळवली. त्याने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पाच पाकिस्तानी फलंदाजांचे बळी घेत पदार्पणातच एका डावात पाच बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
रोहित अन् नवदीप सैनीनंतर संघाच्या प्रमुख खेळाडूला दुखापत; दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत शंका
रेहान अहमदने तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात दमदार कामगिरी करत ५ बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे इंग्लंडने पाकिस्तानला या सामन्यात सहज मात दिली. रेहानने त्याच्या पदार्पणातच केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय आपल्या आईला दिले. यावेळी त्याला त्याच्या आईची आठवण झाली. तो म्हणाला की, “माझा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आईचा आशीर्वाद नसता तर मी इथपर्यंत कधीही पोहोचू शकलो नसतो. मी माझ्या आईचा सदैव ऋणी राहीन, मात्र दुर्दैवाने हे सर्व ऐकण्यासाठी माझ्यासोबत माझी आई नाही. तरीसुद्धा, तिचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे.”
रोहित अन् नवदीप सैनीनंतर संघाच्या प्रमुख खेळाडूला दुखापत; दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत शंका
टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ७ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली गेली होती. या मालिकेत इंग्लंडने यजमान संघाचा ४-३ असा पराभव केला होता. त्यानंतर आता बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडच्या कसोटी संघाने पाकिस्तानला एकतर्फी धूळ चारली आहे. “आशिया खंडात क्रिकेट खेळून एखाद्या देशाला त्यांच्यात जमिनीवर क्लीन स्वीप देणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचे भान आम्हाला आहे. त्यामुळे आमचा हा आनंद आता घरी गेल्यानंतर नव्या वर्षाच्या आगमनानेच संपेल”, असे कर्णधार बेन स्टोक्सने म्हटले आहे.





