पिरंगुट : येथील पवळेआळी मधील भैरवनाथ मंदिरात काकडा आरती सोहळ्याची सांगता करण्यात आली. यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून काकडा आरती सुरू होती. रविवारी याचा समारोप झाला. काकड आरतीचे यंदाचे 57 वे वर्षे तर ज्ञानेश्वरी पारायणाचे 47 वे वर्षे होते. सप्ताहात महाराष्ट्रातील प्रसिध्द प्रवचनकार व किर्तनकार यांची सेवा झाली. यावर्षी 18 वा संत जगामित्र नागा महाराज पुरस्कार कोपरगाव येथील हभप रामायणाचार्य, हभप परशुराम अनर्थे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच अमर निकटे, माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, पोलिस पाटील प्रकाश पवळे, हभप पंडीत महाराज क्षीरसागर, हभप लक्ष्मण महाराज फड, माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे, माजी उपसरपंच राहुल पवळे, माजी सरपंच रमेश पवळे, माजी उपसरपंच वैभव पवळे, ग्रामपंचायत सदस्य महेश वाघ,
माजी उपसरपंच लक्ष्मण निकटे, हभप नारायण सातव, बाळासाहेब निकटे, मारुती नवाळे, अनुप पवळे, तुषार पवळे आदी मान्यवर, ग्रामस्थ तसेच हनुमान तरुण मंडळ, बालवीर युवक मंडळ व सहमत मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवीण सातव यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे यांनी प्रास्ताविक केले.