मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट 5 हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने 45 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
या निर्णयाचा फायदा सुमारे 87 हजारांहून अधिक अधिकारी – कर्मचारी वर्गाला होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
.@msrtcofficial च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने #एसटी ला ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.#ST pic.twitter.com/p4XWOJldG2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 19, 2022
अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळी भेट म्हणून 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही चन्ने यांनी सांगितले.