नवीदिल्ली – सध्या अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात हैदराबादमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. जोरदार पावसामुळॆ साठलेल्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणाला आपला जीव वाचवण्यासाठी थेट गाडी सोडून द्यावी लागल्याचे पाहायला मिळत आहे.
हैदराबादच्या बोराबांदा भागातील हा व्हिडीओ असल्याचे समजते. मुसळधार पावसामुळे एक व्यक्ती त्याच्या बाईकवरून वाहून जाऊ लागली. त्याने कसतरी त्याचा जीव वाचवला.परंतु या प्रयत्नात त्याला आपली बाईक सोडून द्यावी लागली. बाईक थेट पाण्यात वाहून जाताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हैदराबादमध्ये जोरदार पावसाचा हा तांडव पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले.
Heavy overnight #rains once again wrecked havoc in parts of #Hyderabad and outskirts with roads and low-lying areas getting inundated. pic.twitter.com/9n9g12EMb9
— IANS (@ians_india) October 13, 2022
आज सकाळी झालेल्या पावसानानंतरचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर हैदराबादमधील ड्रेनेज सिस्टीमबाबत अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.