मुंबई – बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या कामापेक्षा अनेकदा लाईफ स्टाइलमुळे चर्चेत राहतात. अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांना महागडे गॅजेट,कार्स अशा अनेक गोष्टींचा शौक असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अभिनेता संजय दत्त देखील नुकताच विमानतळावर एका नव्या मर्सडीस मे बॅक गाडीसह दिसून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मर्सिडीजचे मेबॅक हे मॉडेल हौशी आणि व्हीव्हीआयपींना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. इतर कारमध्ये येणारी किरकोळ वैशिष्ट्ये या वाहनात दिसत नाहीत आणि या वाहनाची स्पेशालिटी असणारे अनेक फिचर इतर कोणत्याही वाहनात आढळून येत नाहीत. म्हणुणच ही गाडी अतिशय लक्जरी आहे आणि लिमिटेड व्यक्तीच याचा वापर करतात. संजूबाबाकडे देखील ही गाडी असल्याचे आता समोर आले आहे.
मर्सिडीजचे मेबॅक मॉडेल जगातील निवडक लोकांकडे आहे. याचे कारण म्हणजे या गाडीची गणना सर्वात सुरक्षित कारमध्ये केली जाते. 10 एअरबॅगसह सुसज्ज हे वाहन सर्वात सुरक्षित समजले जाते. ही गाडी फक्त 4.8 सेकंदात 0-100 चा वेग गाठू शकते आणि जेव्हा टॉप स्पीड पकडते तेव्हा ते 250 किमी/ताशी पोहोचू शकते.
संजय दत्तला महागड्या वाहनांचा शौक आहे आणि आता त्याची नवीन मर्सिडीज Maybach S580 देखील त्याच्यासोबत दिसल्याने अनेकांसाठी हा कौतुकाचा विषय ठरत आहे. मेबॅक व्यतिरिक्त, संजय दत्तच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर LWB Vogue SE, Ferrari 599GTB, Rolls-Royce Ghost, Audi A8, Audi R8, Audi Q7, Bentley Continental GT, Mercedes M-Class, Lexus LX 470 आणि PorscheVS, Land. क्रूझरसोबतच हार्ले डेव्हिडसनची फॅट बॉब आणि डुकाटी मोटरसायकल देखील आहे.