नवी दिल्ली – कर्नाटकच्या दिविता रायने मिस दिवा युनिव्हर्स 2022 हा किताब आपल्या नावावर केला आहे. आता जागतिक सुंदरीचा अर्थात मिस युनिव्हर्सचा किताब पटकावण्यासाठी ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सध्या मिस युनिव्हर्स असलेली हरनाझ संधू हिने गेल्या वर्षी मिस दिवा युनिव्हर्स हा किताब पटकावला होता.
दरम्यान, तेलंगणाच्या प्रज्ञा अय्यागारीने मिस दिवा सुपरनॅशनल 2022 हा किताब पटकावला आहे. 23 वर्षीय दिविताचा जन्म कर्नाटकात झाला असला तरी पित्याच्या नोकरीमुळे देशाच्या विविध शहरांमध्ये तिचे वास्तव्य होते. पेशाने आर्किटेक्ट असलेली दिविता मॉडेलींगमध्येही दाखल झाली आहे. (Divita Rai became Miss Diva Universe, will represent India for Miss Universe)