दक्षिण आफ्रिकेची ‘जोजिबिनी टूंजी’ ठरली ‘मिस युनिव्हर्स २०१९’ ची विजेती

अटलांटा – अमेरिकेतील अटलांटामध्ये ६८ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताब आपल्या नावावर केला. या स्पर्धेत जगभरातील ९३ देशातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांना मात देत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

दक्षिण आफ्रिकेतील टोस्लोमध्ये राहाणारी जोजिबिनी २६ वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी लैंगिक भेदभावाशी संबंधित हिंसाचाराविरोधात तिने आवाज उठवला होता. अंतिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं. मात्र या सगळ्यांवर मात करत तिनं मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपलं नाव कोरलं. सोमवारी सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात जोजिबिनीला ‘मिस युनिव्हर्स’चा मानाचा मुकूट देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.