नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो आता पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये भारतीय वंशाच्या मुधोळ हाऊंड या श्वानाचा समावेश करण्यात आला आहे प्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये मुधोळ हाऊंडचा समावेश करण्यात आला आहे 2016मध्ये या श्वानाला भारतीय लष्कराच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यात आला होता दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील मुधोळ या संस्थांनावरून या श्वानाला मुधोळ हाऊंड असे नाव पडले आहे.
बागलकोट जिल्ह्यामध्ये मुधोळ हे संस्थान असून घोरपडे हे तेथील संस्थानिक आहेत ब्रिटिश काळात तत्कालीन संस्थानिक मालोजीराव घोरपडे यांनी पंचम जॉर्जला अशा दोन भारतीय श्वानांची जोडी भेट दिली होती तेच श्वान मुधोळ हाउंड म्हणून ओळखले जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सुद्धा या श्वानाचा समावेश असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत या श्वानांचा लष्करात समावेश केल्यानंतर प्रथम त्यांना तीन आठवडे बेसिक ट्रेनिंग दिले जाते हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 36 आठवड्याचे संपूर्ण ट्रेनिंग दिले जाते या श्वानाच्या शारीरिक वैशिष्ट्यामुळे लष्करामध्ये तो लोकप्रिय आहे.
एक तर त्याची उंची जास्त असते त्याचे पायही उंच असतात तसेच हा श्वान 270 डिग्रीमध्ये पाहू शकतो भारतीय वंशाच्या कोणत्याही इतर श्वानापेक्षा वास घेऊन माग काढण्याची त्याची क्षमता सर्वात जास्त आहे तसेच इतर सर्वांच्या तुलनेमध्ये मुधोळ हाऊंड कमी दमतो त्याची काम करण्याची क्षमता खूपच जास्त आहे हे श्वान भारतीय वंशाचे असल्यामुळे भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणामध्ये काम करण्याची त्यांची क्षमता असते प्रशिक्षकाचा नजरेचा अंदाज घेऊन हे श्वान कार्यरत होते आणि हल्ला करू शकते