प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 19 -जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनला रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका शिवाजीनगर न्यायालयात ठेवण्यात येणार आहे. आपतकालीन वेळेत तिचा वापर करता येणार आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे उपाध्यक्ष ऍड. राजेंद्र उमाप यांनी ही भेट दिली आहे.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व पुणे बार असोसिएशनचे नुकतीच वकील परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. वराळे, राज्य ग्राहक न्यायाधीकरणाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, बार कौन्सिल बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ऍड. जयंत जायभावे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. विठ्ठल कोंडे देशमुख ऍड. अहमदखान पठाण यांच्या उपस्थितीत ही रुग्णवाहिका देण्यात आली. प्रगतशील शेतकरी बाबुराव उमाप यांच्या हस्ते पुणे बार असोसिएशन अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांना देण्यात आली. यावेळी आजी-माजी पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते.