कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचे रिलेशन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, मात्र दोघांनीही कधी याबाबत वाच्चता केली नव्हती. त्यांनी इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल’मध्ये काम केले होते. हा त्यांचा सोबतचा एकमेव चित्रपट होता. मीडियामध्ये अशी चर्चा देखील होती की, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले होते.
कार्तिकने यावर कधीही भाष्य केले नाही, परंतु चित्रपट निर्माता करण जोहरने आता कन्फर्म केलं आहे की हे दोघेही एकमेकांना ‘डेट’ करत होते. करण लवकरच त्याच्या लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनसह परतणार आहे. शोच्या शेवटच्या सीझनमध्ये सारा अली खानने कार्तिकला तिचा क्रश सांगितला होत. शोच्या पुढच्या सीझनचे प्रमोशन करताना, करणने एका संभाषणात खुलासा केला की त्याच्या शोने अनेक नातेसंबंध प्रकाशात आणले आणि त्यात सारा आणि कार्तिकच्या नावांचा समावेश आहे.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांनी एकमेकांना डेट केले होते
इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना करण म्हणाला, ‘मी त्या दिवशी क्रिती सेनॉनला फक्त एक नाव सांगायला सांगितलं होतं! कतरिना कैफने या मंचावर सांगितले होते की, की ती विकी कौशलसोबत चांगली दिसेल, त्यानंतर तिने विकीसोबत लग्न केले. सारा अली खानने कार्तिक आर्यनचा उल्लेख केला आणि त्यांनी डेटिंग सुरू केली.
सारा अली खानने ‘कॉफी विथ करण’मध्ये कार्तिक आर्यनचा उल्लेख केला होता
करण पुढे म्हणतो, ‘आलिया भट्टने रणबीर कपूरच्या अनेकदा उल्लेख केला आहे आणि आज तिचे त्याच्याशी लग्न झाले आहे. या मंचावर खरोखरच अनेक नातेसंबंध निर्माण केले हे आश्चर्यकारक आहे.’ सारा 2018 मध्ये कॉफी विथ करणमध्ये दिसली आणि तिने कार्तिक आर्यनच्या नावाचा उल्लेख केला जो तिला आकर्षक वाटला.
दोघांना ‘लव्ह आज कल’मध्ये एकत्र कास्ट करण्यात आले होते आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथूनच त्यांच्या रोमान्सला सुरुवात झाली. तथापि, 2020 मध्ये हे दोघेही कलाकार वेगळे झाले. तेव्हापासून ते क्वचितच एकमेकांबद्दल बोलले. गेल्या काही महिन्यांमध्ये कार्तिक आणि सारा काही कार्यक्रमांमध्ये एकमेकांशी हसताना आणि गप्पा मारताना दिसले. एप्रिलमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये संवाद साधताना त्याचा एक फोटो समोर आला होता. गेल्या महिन्यात त्यांनी दुसऱ्या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर एकत्र पोज दिली.