लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. येथे भाजपला प्रचंड बहुमत मिळताना दिसत आहे. अशा स्थितीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. लखनौपासून गोरखपूरपर्यंत संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांचा हा उत्साह दिसून येत आहे. लखनऊमध्ये भाजप कार्यकर्ते चक्क बुलडोझर घेऊन पक्ष कार्यालयात पोहोचले. तर ‘सीएम योगींचा पुष्पा अवतार’ गोरखपूरमध्ये पाहायला मिळाला.
दुसरीकडे, गोरखपूरमध्ये पुष्पा चित्रपटाची जादू कार्यकर्त्यांवर झाल्याची दिसली. लोकांनी गोरखनाथ मंदिरासमोर ‘पुष्पा, मी 30 मार्चनंतर थांबणार नाही’ असे पोस्टर लावले आहेत.
निवडणुकीत ‘बुलडोझर’चा मुद्दा प्रचंड गाजला
उत्तर प्रदेश निवडणुकीत बुलडोझरची जोरदार चर्चा झाली. सीएम योगी सुद्धा बुलडोझर बाबा म्हणून उदयास आले. किंबहुना, सीएम योगी आपल्या जाहीर सभांमध्ये माफियांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवण्याचा म्हणजेच माफिया राजवट संपवण्याचा दावा करत राहिले. भाजपचे म्हणणे आहे की, गेल्या 5 वर्षात माफियांवर बुलडोझर चालवण्याचे काम योगी सरकारने केले. तसेच यावेळीही सरकार स्थापन झाल्यास बुलडोझरचा वापर केला जाणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1501810685382361088
कार्यकर्ते साजरा करताहेत उत्सव
यूपी-उत्तराखंड मध्ये बहुमत आणि गोवा-मणिपूरमध्ये सरशी असल्याने भाजपचे कार्यकर्ते देशभर जल्लोष करत आहेत. दुसरीकडे, पंजाबमधील विजयानंतर आपचे कार्यकर्तेही मोठ्या उत्साहात दिसत आहेत.