महर्षीनगर –राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे फ्लेक्स नवीन प्रभाग क्र. 39 मध्ये सातारा रस्त्यालगत लावले होते. हे फ्लेक्स अज्ञांनी फाडले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा प्रकार करण्यात आला असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार केली आहे. याबाबतची तक्रार दाखल करून घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.
मार्केट यार्ड येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार तसेच वनमंत्री दत्तात्रय भरणे येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी फ्लेक्स लावण्यात आले होते, ते अज्ञात व्यक्तीने फाडले. या प्रकाराबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला. यावेळी बाळासाहेब अटल, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, मदन वाणी, निलेश नवलखा, मुन्ना होनराव, मोसिन काझी, कुणाल गायकवाड, संजय दामोदरे, राहुल गुंड, राजू राऊत, प्रशांत सास्टे, आनंद बाफना, दत्तात्रय बंडगर, रत्नाकर पाटील, प्रमोद कोठावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.