पुणे -पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. दि.2 मार्चपासून या मार्गावर जादा 2 लोकल धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे-लोणावळा-पुणे मार्गावर सध्या लोकलच्या 8 फेऱ्या होत आहेत. ही संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.
तर तीन लोकल वाढवण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू होत्या. मात्र, त्यापैकी 2 लोकल धावणार आहेत. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक, युनिव्हर्सल पासधारकांना प्रवासाची मुभा आहे. तर 18 वर्षांखालील मुलांना वयाचा दाखला आणि लसीकरण न झालेल्या नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच तिकीट मिळणार आहे.