चिंबळी – धानोरे (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत केद्रांई माता पॅनलने घवघवीत यश संपादन केले आहे. दरम्यान, भटक्या विमुक्त जातीसाठी अर्ज न आल्याने ही एक जागा रिक्तच राहिली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे व संस्थेचे सचिव सुभाष जाधव यांनी दिली.
निवडणुकीत 13 जागांसाठी 19 अर्ज दाखल झाले होते. त्यातील चौघांनी माघार घेतली तर एक अर्ज बाद झाला होता तर एका उमेदवाराने दोन अर्ज भरले होते. यात केद्रांई माता पॅनलने 12 जागांवर वर्चस्व मिळवले. विजयी संचालकांचे खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख डॉ. राम गावडे, सरपंच अनिल गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, शिवाजी गावडे, मधुकर गावडे, काशिनाथ गावडे, किसन गावडे, राजाराम गावडे, कैलास झेंडे, माजी अध्यक्ष गुलाब गावडे, खंडू गावडे, अशोक गावडे, उपसरपंच विठ्ठल गावडे, सर्जेराव गावडे, पोलीस पाटील बाळासाहेब गावडे, चंद्रकांत गावडे, भाऊसाहेब गावडे, जकात विभागाचे शिवाजी जिजाबा गावडे उपस्थित होते.
विजयी संचालक; हनुमंत गावडे, शामराव गावडे, विठ्ठल गावडे, ईश्वर गावडे, सुनिल गावडे, कैलास गावडे, ज्ञानेश्वर गावडे, अशोक गावडे, राजाराम रोकडे, सारीका गावडे, मंगल गावडे, कमल गावडे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार तंतोतंत पालन करत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विषेश प्रयत्नातून व माजी सरपंच व माजी अध्यक्ष नंदकुमार गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत गावडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शामराव गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
– अनिल गावडे, सरपंच, धानोरे