लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी पोहोचलेल्या कन्हैय्या कुमार यांच्यावर हल्ला करण्यात आला. कन्हैय्या कुमार यांच्यावर अॅसिड फेकल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेस कार्यालयात पोहोचल्यानंतर कन्हैय्या यांच्यावर शाईफेक करण्यात आली. तसेच मुर्दाबादचे नारे देण्यात आले. मात्र कन्हैय्या यांच्यावर अॅसिड फेकण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यापैकी काही थेंब कन्हैय्या यांच्या बाजुला असलेल्या तरुणांच्या अंगावर पडल्याच काँग्रेसने म्हटलं आहे.
कन्हैय्या कुमार येथील काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री सदफ जफर यांचा अर्ज भरण्यासाठी गेले होते. सदफ जफर या व्यवसायाने शिक्षका असून त्या अभिनेत्री देखील आहे. त्या आता लखनौ येथील रहिवासी आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधातील आंदोलनामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी सदफ जफर यांनी लखनौ येथून अटक केली. 2019 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. दंगल आणि हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर सदफ जफर सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.