मुंबई -“जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली निया शर्मा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
View this post on Instagram
निया अभिनयासोबतच सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. तिने नुकतेच ग्लॅमरस फोटो आपल्या ट्वीटरसह इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते सेलिब्रिटी देखील अवाक झाले आहेत.
View this post on Instagram
>निया शर्माने लेटेस्ट फोटोशूट करून घेतले आहे, जे तिने चाहत्यांना दाखवले आहे. फोटोंमध्ये निया कारच्या बाजूला उभी राहून पोज देत आहे. यादरम्यान तिने घातलेल्या आउटफिटने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नियाने एक शर्ट घातला आहे ज्याची बटणे तिने उघडी ठेवली आहेत. यासोबत तिने जीन्स घातली आहे.
View this post on Instagram
“इतकं बोल्ड दिसणं तुला कसं जमतं?” अशी प्रतिक्रिया सोशलवर युजर्सने दिली आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर या फोटोजना लाईक्स आणि कॉमेंटस मजबूत मिळाल्या असून तिचं फॅन फॉलोईंगही वाढत असल्याचं दिसून येत आहे.