नाशिक – शेतकऱ्याला कुणी सहजासहजी मुलगी देत नाही, त्याच्याकडे आज ही उपेक्षेनं पाहिलं जाते. मात्र शेतकऱ्यानं मनात आणलं तर तो काही की करू शकतो, हे आज गोपीनाथ बोडकेंनी दाखवून दिलं आहे. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू-वर दोघेही हेलिकॉप्टरमधून जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की, यात इतकं विशेष काय, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्हीही मुलं शेतकऱ्यांची आहेत आणि शेतकऱ्याच्या मुलांचा हा थाट सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
Nashik: O Sheth,the farmer has just made a noise Helicopters rushed to Java The helicopter landed at a distance from the wedding venue carrying Navradeva from the helipad 5 km from Pimpalgaon.From there,Navradeva was brought to the wedding venue by car.The distance from pic.twitter.com/h3k7KK2P4I
— BHARAT GHANDAT (@BHARATGHANDAT2) January 14, 2022
केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरदेवाला लग्नमंडपात नेण्यासाठी एका शेतकऱ्यांने चक्क हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं. आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नात आपल्या जावयाला आणण्यासाठी दहा किलोमीटर अंतराचे भाडे त्याने एव्हिएशन कंपनीला दिले. त्यामुळे नेहमीच उपेक्षेने बघितला जाणारा शेतकरी जिद्दी आणि श्रीमंत असू शकतो हा नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.