ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांचा उपक्रम
बारामती – राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बारामती देखील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.
बारामती शहर व परिसरामधील अनाथ गरजू नागरिक की जे एस टी स्टँड, फुटपाथ, रेल्वे स्टेशन आणि मंदिर परिसरात उघड्यावर झोपलेले आहेत. अशांना मध्यरात्री 12 वाजता बारामतीकरांच्या वतीने अंगावर रजई टाकून त्यांना मायेची उब देऊन हा वाढदिवस साजरा केला.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे, नगरसेवक बिरजू मांढरे ,अभिजित चव्हाण व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.