पिंपरी – बॅंक खात्यावरील रक्कम जादा झाली असून तुमच्यावर आयकर विभाग, पोलीस विभाग यांच्याकडून कारवाई होईल, अशी भिती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकांची एक कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना कोकणेनगर, काळेवाडी येथे घडली.
आप्पासाहेब पांडूरंग मिठारी (वय 63, रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांनी गुरुवारी (दि. 9) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मनिष मेहता (मोबाइल क्रमांक 8793727067), संजय कुलकर्णी (मोबाइल क्रमांक 8082110366), गणेश ठाकुर, पीयूष, अनिकेत, विलास शाखापुरे (मोबाइल क्रमांक 8979333887), नरेंद्र प्रसाद यादव, सतीश पाटील (मोबाइल क्रमांक 8080777803), संतोष रायकर (मोबाइल क्रमांक 9768545429), राहुल सावंत (मोबाइल क्रमांक 8976101310), प्राची मॅडम (मोबाइल क्रमांक 7208501112), श्रृती अग्रवाल (मोबाइल क्रमांक 8286416044), हरीश रेड्डी (मोबाइल क्रमांक 7208505202), सदाशिव रामचंद्र पाटील (मोबाइल क्रमांक 8097379995) या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2014 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत ही घटना कोकणेनगर, काळेवाडी येथे घडली.
आरोपींनी फिर्यादी मिठारी यांना फोन करून ऍगॉन रिलीगिअर लाईफ इन्शुरन्स, रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसी घेण्यासाठी तसेच त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला इनकम मिळून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यावरील रक्कम जादा झाल्याचे सांगून आयकर विभाग, आयआरडीए ब्रॅन्च मॅनेजर, क्राईम ब्रन्च पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांना भिती घातली. फिर्यादी यांच्याकडून 39 लाख 71 हजार रुपये रोख, तसेच विविध बॅंकेच्या खात्यावर धनादेशाद्वारे एक कोटी 45 लाख 34 हजार 66 रुपये असे एकूण एक कोटी 85 लाख पाच हजार 66 रुपयांची फसवणूक केली.