मुंबई – क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडत आहेत. आता मलिक यांच्या टार्गेटवर भाजप असून आज मलिक यांनी थेटे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीसांनी हे आरोप फेटाळून लावले. तसेच मलिकांना इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावताना नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पुरावे आपण दिवाळीनंतर शरद पवार यांच्याकडे सोपविणार असल्याचे म्हटले. त्याला मलिकांनी प्रत्युत्तर दिलं असून ‘है तैयार हम’, असं ट्विट केलं. त्यामुळे दिवाळात पुन्हा राजकीय आतषबाजी होणार असं चित्र आहे.
दरम्यान यावर उद्योजक आणि विश्लेषक तेहसिन पुनावाला यांनी प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, तर दिवाळीची वाट पाहण्याऐवजी किंवा शरद पवार यांच्याकडे तक्रार करण्याऐवजी, फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडेच पुरावे सादर करणे त्यांचे कर्तव्य आहे, असे तहसीन पुनावाला यांनी म्हटलंय. तसेच, साहजिकच ते केवळ बडबड करत आहेत, असेही पुनावाला यांनी ट्विट करुन म्हटलंय.
If the Hon’ble ex CM/ HM Fadnavis ji has “evidence” that shri Mawab Malik ji is associated with the Underworld, instead of waiting for Diwali to get over or complain to Sharad Pawar ji, as LoP he is duty bound to present the evidence to the Mumbai Police.
Obvious he is bluffing— Tehseen Poonawalla Official 🇮🇳 (@tehseenp) November 1, 2021
ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.