कॅनबेरा, (ऑस्ट्रेलिया) – करोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी आता ऑस्ट्रेलियाने आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि राजदानी कॅनबेरामधील ज्या नागिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे आशांना आता आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
विदेशातून परत आल्यांनंतर या नागरिकांना विलगीककरणात राहण्याची आवश्यकता असणार नाही. सध्ये केवळ शेजारील न्यूझिलंडमधील पर्यटकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी आहे. या पर्यटकांनाही लसीकरण पूर्ण केलेले असण्याची पूर्वअट घालण्यात आली आहे.
करोनाची साथ सुरू झाली तेंव्हापासूनच ऑस्ट्रेलियाने आपल्या सीमा बंद केल्या होत्या. ऑस्ट्रेलियातील कायम नागरिक आणि अत्यावश्यक कामासाठी ऑस्ट्रेलियात येणाऱ्या विदेशी नागरिकांना प्रवेश दिला जात होता. या नागरिकांनाही हॉटेलांमध्ये स्वखर्चाने 14 दिवस विलगीकरणामध्ये रहावे लागत होते.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि कॅनबेरातील 16 वर्षांवरील 80 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या नागरिकांना आता आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी असणार आहे. सा नागरिकांची संख्या अंदाजे 1 कोटी 40 लाख इतकी आहे.