वाघोली – युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून हवेली तालुक्यात वाघोली येथे वाघेश्वर मंदिर ते केसनंद फाटा पुणे नगर महामार्गाने केंद्र सरकारने केलेल्या अमानुष इंधन दरवाढीच्या विरोधात भव्य सायकल व बैलगाडी रॅली काढून आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा जोरदार निषेध केला. हे आंदोलन कोणत्या व्यक्ती विरोधात नसून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात असल्याचे सांगून नागरिकांच्या भावनांचा केंद्र सरकारने विचार करून इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
सायकल व बैलगाडी रॅली आंदोलनात युवासेना सहसचिव विशाल सातव, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव पाटील,उपजिल्हा युवा अधिकारी गौरव काळभोर, वाघोली शहर प्रमुख दत्तात्रय बेंडवले, तालुका युवा अधिकारी,उप तालुका युवा अधिकारी, विभाग युवा अधिकारी, उपविभाग युवा अधिकारी, यांच्यासह मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी व युवासैनिक सहभागी झाले होते.