ब्युनोस आयर्स – काही कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर राज्य करणाऱ्या डायनोसॉर या महाकाय प्राण्याचा अंत अवकाशातून आलेल्या एका महाकाय उलकेमुळे झाला होता इतक्या वर्षानंतरही डायनोसॉर या प्राण्याविषयीचे आकर्षण कायम असून अर्जेंटीनामध्ये नुकतीच डायनासोरची शंभर अंडी आणि काही सांगाडे सापडल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे डायनोसॉरचे कबरस्थान असावे असे वाटणाऱ्या एका परिसरात ही शंभर अंडी सापडली असून कोट्यवधी वर्षापूर्वी डायनोसोर समूहाने वास्तव्य करत होता या निष्कर्षाला आता पुष्टी मिळाली आहे.
या अंड्यांची तपासणी केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की हे सर्व डायनासोर एकाच प्रजातीचे होते सर्व अंडी एकाच प्रजातीच्या डायनासारची आहेत तज्ञानी दिलेल्या माहितीप्रमाणे ही अंडी 19 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीची असावीत एखाद्या चिकनच्या आकाराची ही अंडी आठ ते दहा या समूहाने ठीक ठिकाणी सापडली आहेत याच ठिकाणी संशोधकांना डायनासोरचे तब्बल 80 सांगाडेही सापडले आहेत डायनोसॉर समूहाने किंवा कळपाने रहात होते का याबाबत गेल्या काही वर्षांमध्ये उलटसुलट मते व्यक्त केली जात होती आज पासून 15 कोटी वर्षापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणे तेव्हा डायनोसॉर कळपाने राहत असल्याचे पुरावे मिळाले होते.
पण आता ही सापडलेली अंडी तब्बल 19 कोटी वर्षापूर्वीची असल्याने त्या पंधरा कोटी वर्षाच्या आधीही डायनोसर समूहाने राहत होते ही गोष्ट सिद्ध होत आहे अर्जेंटीनामध्ये यापूर्वी 1970 मध्ये डायनासोरचे काही सांगाडे सापडले मिळाले होते ही अंडी आणि हाडांच्या सांगाड्यांमुळे डायनासोरचे संशोधन करण्यास आणखी बळकटी येणार असल्याचे संशोधकांनी सांगितले