मुंबई – बॉलीवूड अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ने अल्पावधितच आपल्या जबरदस्त स्टंटच्या मदतीने चाहत्यांमध्ये ऍक्शन हिरो म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मात्र, सध्या टायगर वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. होय…. टायगरच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचे नुकतंच निधन झाले आहे.
टायगर श्रॉफचा फिटनेस ट्रेनर ‘कैझाद कपाडिया’चे बुधवारी (दि. 13) निधन झाले. कैझादच्या निधनाचं कारण अद्याप समजू शकले नाही. मुंबईतील के11 अकॅडमी ऑफ फिटनेस सायन्सेसचा तो मालक होता.
टायगरसोबतच तो इतरही बॉलिवूड सेलिब्रिटींचा फिटनेस प्रशिक्षक होता. कैझादच्या निधनानंतर टायगरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्याला श्रद्धांजली वाहिली. कैझादच्या अचानक जाण्याने टायगरला अतिशय दुःख झाले आहे.