मुंबई – बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इंद्र कुमार या जोडीने अनेक चित्रपटात एकत्रित काम केले असून त्यांच्यातील संबंधही खूप चांगले आहेत. इंद्र कुमारच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा अजय देवगण झळकणार आहे.
हा चित्रपटाचे नाव “थॅंक गॉड’ असे असून ही एक कॉमेडी मूव्ही आहे. या चित्रपटातील अजय देवगण यांच्या भूमिकेबाबत मिळालेली माहिती अशी की, या अजय देवगण अशी भूमिका साकारणार आहे जी की त्याने यापूर्वी कधीही साकारलेली नाही. चित्रपटाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, यात
अजय हा मृत्युदेवता म्हणजे यमराजची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला असून यात स्वर्ग आणि नर्क दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले असून 2022च्या मध्यात हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, “थॅंक गॉड’मध्ये अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिका साकारत आहे. या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असताना पृथ्वीवर भूकंप येते आणि त्यात सिद्धार्थचा मृत्यू होतो. त्यानंतर तो यमराजकडे जातो.