मोजक्याच पण दर्जेदार सिनेमांनी अभय देओलने आपली स्वतंत्र ओळख बनवली आहे. त्याच्या सिनेमांची जेवढी चर्चा झाली त्यामानाने त्याच्या पर्सनल आयुष्यातील घडामोडींविषयी कोणाला जास्तीची माहिती नाही. मात्र, आता त्याच्या पर्सनल आयुष्यातील एक महत्त्वाची बातमी समजली आहे.
अभय देओलने आपल्या सोशल मीडियावर शिलो शिव सुलेमानबरोबरचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे शिलोबरोबरच्या आपल्या रिलेशनशिपला अभयने ऑफिशियली अनाउन्स केले असल्याचा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे. शिलो सुलेमान कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. “फ्री, फॉलोईंग, क्रिएटिव्ह, फन, निडर, शांत आणि टॅलेंटेड, सेन्सुअल आणि सेक्सी शिलोमध्ये हे सगळे गुण आहेत.’
असे अभयने आपल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. यापूर्वी अभय देओल बराच काळ प्रीती देसाईबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर अभय सेलिब्रिटी मॅनेजर आणि आर्टिस्ट साईरिना मामिकबरोबरही रिलेशनशिपमध्ये होता, अशी चर्चा होती.
“सोचा न था’मधून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या अभयने “जिंदगी मिलेगी न दोबारा’, “देव डी’ आणि “एक चालीस की ‘लास्ट लोकल यासारख्या चांगल्या सिनेमांमधून काम केले आहे. मात्र सध्या तरी कोणताही सिनेमा त्याच्याकडे असल्याचे ऐकिवात नाही.