वाघोली – लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या वाघोली पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
वाघोली तालुका हवेली गावचा समावेश पुणे महानगरपालिकेत होण्याअगोदर पुणे पोलीस आयुक्तालयात लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस ठाणे समाविष्ट करण्यात आली होती.
राज्यशासनाकडे वाघोली साठी स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे ही मागणी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
वाघोली ची लोकसंख्या जवळपास दोन लाखाच्या आसपास पोहोचली असून या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या ठिकाणी पोलीस ठाण्याची उभारणी व्हावी अशी मागणी होत आहे. सध्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वाघोली पोलीस चौकीच्या प्रभारी अधिकारीपदी शिवशांत खोसे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्हेगारीवर अंकुश ठेऊन उत्तम कामकाज केले जात आहे.
वाघोली मध्ये वाहतूक शाखा व पोलिस ठाण्याच्या अंतर्गत वाघोली पोलीस चौकी देखील उभारण्यात आली असून या मार्फत आता वाहतूक कोंडी व नागरिकांना कायदा व सुव्यवस्था कामी मोठी मदत होत आहे.
सध्यावाघोली मध्ये नवीन पोलीस ठाणे व्हावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सरपंच वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, बाळासाहेब सातव पाटील,माजी उपसरपंच संदीप सातव, आदी पाठपुरावा करीत आहेत.
वाघोली पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचारी बाळासाहेब हराळ यांना पोलीस अधिकारी कक्ष कार्यालयाची फित कापण्याचा बहुमान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्याने पोलिसांकडून अधिकार्यां प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.