बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मात्र ती अभिनय क्षेत्रात कधी पदार्पण करणार याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला आहे.
तर सुहाना लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपट निर्माती झोया अख्तर लवकरच सुहाना खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार असल्याची माहिती आहे.
Pinkvilla च्या बातमीनुसार, झोया लवकरच ‘आर्ची’ या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुकवर भारतीय रुपांतरणावर चित्रपट बनवणार आहे.
हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, ज्यासाठी झोयाने तयारी सुरु केली आहे. असे म्हटले जात आहे की सुहाना खानचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो.
ही बातमी समोर येताच शाहरुख खानच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. आता हा चित्रपट कधी रीलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.