भरूच : गुजरातमधील अंकलेश्वर येथील एका खाजगी रुग्णालयात एक महिन्यापूर्वी आपल्या पत्नीच्या सलाईन बॉटलमध्ये सायनाइड विष टाकून तिची हत्या केल्याप्रकऱणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.
याविषयीची सविस्तर माहिती अशी की, वैवाहिक कलहातून पतीने हे कृत्य केलं.३४ वर्षीय उर्मिला वसावा हिला छातीत दुखत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता
शुक्रवारी मृत महिलेचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यावर हे प्रकरण उघड झालं. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालं की, वसावाचा मृत्यू सायनाईड विषामुळे झाला. जिग्नेश पटेलनेच आपली पत्नी उर्मिला वसावाला इंजेक्शनच्या माध्यमातून विष दिल्याचं समोर आलं. जिग्नेश अंकलेश्वरच्या एका कारखान्यात काम करतो.
महिलेला ८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायनाईडचं इंजेक्शन दिल्यानंतर लगेच महिलेचा मृत्यू झाला होता. यावेळी महिलेच्या आसपास कोणताही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते.