ऐझ्वाल : टोकियो ऑलिम्पिकमध्येपहिल्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून इतिहास रचला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूला जिंकण्यासाठी महत्त्वाची मदत केली. पंतप्रधानांनीच मीराबाईला उपचारांसाठी अमेरिकेत पाठवले. त्याचप्रमाणे त्यांनी मणीपूरच्या आणखी एका खेळाडूला देखील मदत केल्याने आपल्याला आनंद झाल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी म्हटले आहे.
बिरेन सिंह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, मी या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतली तेव्हा त्यांनी मीराबाईला केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे मीराबाई चानूने देखील सत्कार समारंभावेळी बोलताना पंतप्रधानांकडून मिळालेल्या मदतीचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी मीराबाईला केलेली मदत पाहून मला आश्चर्य वाटले.
पंतप्रधान मोदींनी जर मीराबाईच्या मांसपेशींच्या ऑपरेशनसाठी त्याचप्रमाणे प्रॅक्टिससाठी अमेरिकेला पाठवले नसते तर मीराबाई हे यश मिळवू शकली नसती. मोदींनी मीराबाईला मदत करत तिची मोठी समस्या छोटी केली. पंतप्रधानांनी मीराबाईला मदत केल्याचे समजल्यावर मणिपूरच्या लोकांनाही मोठा आनंद झाला होता.
I was surprised to learn about the help offered by PM Modi to Olympian weightlifter Mirabai Chanu. She told me that PM Modi personally intervened to take care of her medical and training requirements and sent her to the US: Manipur CM N Biren Singh pic.twitter.com/utHD22bOR3
— ANI (@ANI) August 6, 2021
मीराबाईला चानूला अनेक दिवसांपासून पाठ दुखीची समस्या होती. ही माहिती पंतप्रधान मोदी आणि पीएमओला मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वत: मीराबाईच्या उपचारांचा आणि ट्रेनिंगचा खर्च उचलला आणि मीराबाईला अमेरिकेला पाठवले. त्याचप्रमाणे मोदींनी मणिपूरच्या आणखी एका खेळाडूला मदत केल्याचा उल्लेख देखील बीरेन सिंह यांनी केला मात्र त्याचे नाव त्यांनी सांगितले नाही.