मुंबई – बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यामुळे तिला ट्रोलदेखील केले जाते. असाच काहीसा प्रकार पुन्हा घडला आहे.
View this post on Instagram
सोनम सध्या लंडनमध्ये स्वातंत्र्य उपभोगत आहे असे म्हणाली, परंतु याच वक्तव्यामुळे नेटकरी तिच्यावर भडकले आहेत.देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केले तर स्वातंत्र्य?, असा सवाल करत सध्या तिला ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
सोनम कपूर सध्या आपल्या पतीसोबत लंडनमध्ये राहत आहे. अलीकडेच एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत लंडनमध्ये मी स्वातंत्र्याचा अनुभव घेते आहे, असे म्हणाली. मला इथलं स्वातंत्र्य आवडते. मी स्वत: स्वयंपाक करते, घराची साफसफाई करते.
View this post on Instagram
बाजारातून किराणा खरेदी करते, असा अनुभव तिने सांगितला. या विधानामुळे सध्या तिला जोरदार ट्रोल केले जात आहे. “लंडनमधील स्वातंत्र्य’ या वाक्यावरून नेटकऱ्यांनी सोनमवर निशाणा साधला आहे.
View this post on Instagram
भारतातदेखील सोनम स्वत: काम करू शकली असती घरकामांसाठी माणसं ठेवण्याची तिच्यावर कुणी जबरदस्ती केली नाही, असे म्हणत नेटकऱ्यांनी सोनमचा समाचार घेतला.