सोफिया हयात एखाद्या फुटकळ चित्रपटात झळकली असेल. कोणत्या सिरीअलमध्येही ती नव्हती. मात्र, बिग बॉसमध्ये आली होती. त्यामुळे तिला अभिनेत्री म्हणणे योग्य नाही. मात्र, ती सतत चर्चेत असते. तिच्या फोटो नियमित अपलोड होत असतात. मध्यंतरी ती नन झाली होती.
त्यानंतर तिने लग्न केले. म्हणजे तिच्या दृष्टीने हा गंमतीचा विषय होता का, हे कळायला मार्ग नाही. काही काळ भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंसोबतचे तिचे फोटोही झळकले होते. आता तिच्यावर एक घाणेरडा आरोप झाला आहे.
खतरों के खिलाडीचा स्पर्धक अभिनव शुक्ला याच्यासोबत या सोफियाचे रिलेशन असल्याचा आरोप एका व्यक्तीने सोशल मीडियावर केला आहे.
हे संबंध शारीरिक पातळीवरचे असल्याचा दावा करताना त्याने सोफियाबद्दल अपशब्दही वापरले आहेत. त्यावरून सोफिया भडकली असून तिने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण अभिनव शुक्ला कोण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. त्याला मी कधी भेटलीच नाही तर वन नाइट स्टॅंडचा विषयच येत नाही. त्याची आणि माझी साधी ओळखही नसल्याचे तिचे म्हणणे आहे.
संबंधित यूजर ज्याने सोशल मीडियावर कथित आरोप केले आहेत, त्याला मी ब्लॉक केले होते. त्यामुळे त्याने नवे अकाऊंट सुरू करून आपल्यावर आरोप केले असून धमकावण्याचा प्रकारही केला असल्याचे सोफियाचे म्हणणे आहे.
दरम्यान, सोफिया गेल्या काही दिवसांत चर्चेत नव्हती. तिने कोणते नवे फोटोही टाकले नव्हते. त्यात अचानक तिच्यावर अशा खालच्या पातळीवरचे आरोप होणे आणि अचानक तिच्यावरच
होणे यामागे काही कारण असू शकते का? संबंधित शोचा टीआरपी वाढवण्याचा तर हा प्रयत्न नाही. काहीही होउ शकते. सबसे बडा रूपय्या…