भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्काला जानेवारीत कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्याच्या छोट्या वामिकाला पाहण्यासाठी चाहते खूपच उत्साहीत असून पुन्हा एकदा वामिकाची एक झलक सोशल मीडियावर समोर आली आहे.
भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. यावेळी विराटसह अनुष्का आणि वामिकाही रवाना झाले आहेत. नुकताच एबी डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत वामिकाचा एक फोटो व्हायरल होत आहे.
एबी डिव्हिलियर्सची पत्नी डॅनियलने तिच्या मुलीचा आणि वामिकाचा क्युट फोटो शेअर करत “बेबी तिच्या पहिल्या मौत्रिणीला मिठी मारतेय, असे कॅप्शन दिले आहे.
डॅनियलने शेअर केलेल्या मुलींच्या या क्युट फोटोवर अनुष्काने देखील हार्ट इमोजी टाकून प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे फोटोच्या खाली लगेच वामिका आणि येन्टी असे म्हणत अनेकांनी दोघींसाठी प्रेम व्यक्त केले आहे. या फोटोवरुन डाव्या बाजूला असलेली वामिका असल्याचे अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
या फोटोमध्ये वामिका आणि येन्टी दोघींनीही बेबी पिंक रंगाचा सेम फ्रॉक घातला आहे. डॅनियलने काही दिवसांपूर्वीही इंन्टा स्टोरीमध्ये तिचा आणि अनुष्काचा फोटो शेअर केला होता. ज्यात दोघींच्या हातात मुली आहेत. दोघींनीही मास्क आणि फेस शिल्ड लावले होते. हा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.