बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहकडे सध्या अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी एका पॅन इंडिया चित्रपटामुळे तो चर्चेत आला होता. यानंतर तो आता दिग्शदर्शक शंकर यांच्यासोबत “अन्नियन’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात रणवीरसोबत “कबीर सिंह’मधील अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य नायिकेची भूमिका साकारणार असल्याचे समजते. यात कियारा ही रणवीरसोबत रोमांस करताना चाहत्यांना पाहण्यास मिळणार आहे. दिग्दर्शक शंकर यांनी या चित्रपटासाठी कियाराला कास्ट केल्याचे समजते.
View this post on Instagram
शंकर हे सध्या साउथ सुपरस्टार राम चरणसोबत आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच ते रणवीरसह या प्रोजेक्टचे काम सुरू करणार आहेत. या संदर्भात रणवीरने नुकतीच दिग्दर्शक शंकर यांची चेन्नईत भेट घेतली होती.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कियारा आडवाणी लवकरच “शेरशाह’मध्ये सिद्धार्थसोबत झळकणार आहे. याशिवाय ती “भूल भुलैया 2′ आणि “जुग जुग जियो’मध्ये काम करत आहे. दुसरीकडे रणवीरचा स्पोर्टस ड्रामा “83′ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यासह तो “तख्त’, “जायेशभाई जोरदार’ आणि “सर्कस’मध्ये झळकणार आहे.