सासवड -पुरंदर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीचे कारभारी आज निवडण्यात आले. अपेक्षेप्रमाणे यात शिवसेनेने बाजी मारली. जवळपास 15 गावांमध्ये शिवसेनेच्या विचारांचे सरपंच पदारूढ झाले आहेत. कॉंग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर तर भाजपाने खाते उघडले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
शिवरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी असल्याने या प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने सदरच्या सरपंच पदाचे आरक्षण हे रिक्त राहिली असून उपसरपंचपदी पौर्णिमा कामथे यांची निवड करण्यात आली.
भाजपने खाते उघडले
भाजपने दिवे, झेंडेवाडी, गराडे येथील सरपंचपदे पटकाव पुरंदरच्या ग्रामपंचयतीत खाते उघले आहेत. एकंदरच पुरंदरच्या राजकारणामध्ये देखील भाजपाने प्रवेश केल्याची चर्चा रंगत आहे.