पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील झोपडपट्टीवासियांच्या हक्काचे संरक्षण तसेच त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या झोपडपट्टी कार्यकारीणी आघाडीच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष विशाल पवार यांच्या हस्ते कार्यकारणी सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी 70 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सरचिटणीस प्रदिप रणदिवे, अजय शिंदे, महेश सकट, सुरेश तेलंग, सागर टाक, अशोक घाडगे पाटील, तसेच उपाध्यक्ष मंदा वाघमारे, सचिन ससाने, शिल्पा जायगुडे, व इतर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. पक्षाचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपूरे, संदिप लोणकर यावेळी उपस्थित होते.