मुंबई – सलग चौथ्या दिवशी जागतिक चलन बाजारात डॉलरच्या दरात वाढ झाल्यामुळे जागतीक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर दिल्ली सराफात ( gold price today ) सोन्याचे दर गुरुवारी 534 रुपयांनी कमी होऊन 48,652 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आले.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात बरीच घट झाल्यामुळे काहीजण सोने खरेदीचा विचार करीत आहेत. गुरुवारी दिल्ली सराफा तयार चांदीच्या दरात 628 रुपयांची घट ( Silver price today ) होऊन चांदीचा दर 62,711 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
या घटनाक्रमाची कारणमीमांसा करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेत नवीन पॅकेज देण्यासंदर्भात अमेरिकेची संसद आणि व्हाईटहाऊस दरम्यानची चर्चा लांबत चालली आहे.
त्याचबरोबर चार दिवसापासून डॉलरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सोन्याची ( gold )मागणी कमी होऊन सोन्याचे दर कमी झाले आहेत असे त्यांनी सांगितले. मात्र एक महिन्यापूर्वीच्या तुलनेत सध्या सोन्याचे आणि चांदीचे ( Silver ) दर बरेच कमी आहेत.