सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात रोज नव्याने निष्पन्न होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 51 हजार 774 इतकी झाली आहे.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुका ः सातारा 1, सातारा रोड, गोजेगाव प्रत्येकी 3, केसरकर पेठ, सदरबझार, पिंपळवाडी प्रत्येकी 2, माची पेठ, लिंब, सेंट पॉल स्कूल, पिरवाडी, आरळे, शाहूनगर, रामाचा गोट, नेले, शिवथर, जांब बु, कोडोली, वनवासवाडी, किडगाव, चिंचणेर वंदन, जोतिबाचीवाडी, निनाम पाडळी, देगाव, करंडी, वेणेगाव प्रत्येकी 1.,
कराड तालुका : शनिवार पेठ 2, कोष्टी गल्ली, मानेगाव, शेवाळेवाडी प्रत्येकी 1., पाटण तालुका ः ब्राम्हणपूरी पाटण, चाफळ, मराठवाडी प्रत्येकी 1., फलटण तालुका ः फलटण 5, होळ 3, रविवार पेठ, साठे, वाठार निंबाळकर, जावळी, रावडी, खामगाव, सुरवडी, सांगवी, साखरवाडी, पिंप्रद, जाधववाडी प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः खटाव 3, कुरोली, विखळे, तरसवाडी प्रत्येकी 2, भुरकवडी, वर्धनगड, औंध, निमसोड, भाकरवाडी, वडूज, दातेवाडी, शिंगणवाडी प्रत्येकी 1., माण तालुका ः म्हसवड 3, बांगरवाडी, पिंगळी खुर्द, पळशी प्रत्येकी 2, नरवणे, गोंदवले, गोंदवले बु, दहिवडी, कुळकजाई, दिवड प्रत्येकी 1.,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव 2, पिंपोडे बु., एकसळ, वेलंग प्रत्येकी 1., जावळी तालुका ः बहुले, सर्जापूर, रुईघर प्रत्येकी 1., वाई तालुका ः रविवार पेठ, सुरुर, सह्याद्रीनगर, गरवारे कॉलनी एमआयडीसी, वहागाव प्रत्येकी 1.,
खंडाळा तालुका ः म्हावशी, पिसाळवाडी, संभाजी चौक खंडाळा, भादे, शिरवळ प्रत्येकी 1., महाबळेश्वर तालुका ः बेल एअर हॉस्पीटल पाचगणी, महाबळेश्वर प्रत्येकी 1.