नवी दिल्ली – 15 जानेवारी 2021 पासून सर्व लॅंडलाइनवरून मोबाईलवर कॉल करताना आधी “0′ लावावा लागणार आहे. दूरसंचार विभागाने फिक्स्ड लाइन आणि मोबाईल सर्व्हिसेससाठी पुरेसे क्रमांक उपलब्ध करण्याबाबत ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या शिफारशी विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
यानुसार लॅन्डलाईनवरून मोबाईलवर फोन लावताना क्रमांकाच्या आगोदर “0’लावावा लागेल. लॅंडलाइन ते लॅंडलाइन, मोबाईल ते लॅंडलाइन आणि मोबाइल ते मोबाइल कॉल करताना कोणताही बदल होणार नाही.
एखादा ग्राहक “0′ न लावता मोबाइलवर लॅण्डलाइनवरून फोन करेल तेव्हा योग्य घोषणा ऐकू येईल. सर्व लॅण्डलाइन ग्राहकांना “0′ डायलिंगची सुविधा दिली जाईल. यामुळे अंदाजे 2539 दशलक्ष क्रमांकाची मालिका निर्माण होणे अपेक्षित आहे.
हे भविष्यातील वापरासाठी पर्याप्त क्रमांक मोकळे होतील. पुरेसे क्रमांक मोकळे झाल्यामुळे भविष्यात अधिक क्रमांक वितरित करता येतील आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मोबाइल ग्राहकांना होईल.