रेडा -दैनिक प्रभातने दिवाळी अंकात दर्जेदार साहित्य देऊन दीपोत्सव विशेषांक वाचनीय तयार केला आहे. अभ्यासू लेखकांनी चांगले लेखन करून दीपावलीचा वाचकांना अनोखा गोडवा दिला आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शनिवार (दि.14) भरणेवाडी (ता इंदापूर) येथे दैनिक प्रभातच्या दीपोत्सव अंकाचे प्रकाशन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निवासस्थानी केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी इंदापूर तालुका प्रतिनिधी नीलकंठ मोहिते, अभिनेते शिवकुमार गुुुणवरे, रामदास पवार, बाळासाहेब कवळे, वितरक महेश स्वामी, उपस्थित होते. नीलकंठ मोहिते यांनी स्वागत केले. रामदास पवार यांनी आभार मानले.