बारामती – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जेजुरीत भव्य पुतळा बसवण्यात येणार असल्याने जेजुरीच्या वैभवात आणखी भर पडेल, असे प्रतिपादनराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सातारा जिल्हा महिला आघडी पक्ष निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी केले.
जेजुरी गडावर अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्याचे काम सुरू आहे, त्याची पाहणी डॉ. पाटील यांनी केली त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, अशोक खोमणे, संतोष खोमणे, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, व्यवस्थापक घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जेजुरी गडावर पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील समाज बांधवांनी आणि स्थानिकांनी अनेकवेळा केली. यासाठी अनेक आंदोलनेही झाली.
दरम्यान, जेजुरी गडावर अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, पत्रकार रमेश लेंडे यांच्या पुढाकारामुळे पुतळा उभा राहतोय ही सर्व समाजासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.